Chikhali News : कुदळवाडीतील महापालिका शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग सुरु करा : दिनेश यादव

एमपीसीन्यूज : चिखली-कुदळवाडीतील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा क्र.89मध्ये सध्या विद्यार्थ्यांना पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण मिळते. या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नाहक ससेहोलपट होत आहे. त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाने या शाळेत 8 वी ते 10वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

याबाबत यादव यांनी महापालिका शिक्षणाधिकारी पराग मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कुदळवाडी महापालिका शाळा क्र.89 मध्ये 1 ली ते 7 वी पर्यंत वर्ग सुरु करण्यास मान्यता आहे. परंतु 8 वी पासूनच्या पुढील शिक्षणास विद्यार्थ्यांना इतरत्र जावे लागते.

कुदळवाडी भागात कामगार वर्ग, मजुर वर्ग, गोरगरीब लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत प्रवेश घेण्याकरिता त्यांच्या पालकांना तेथील शाळेची फी भरणे शक्य नाही. तसेच या शाळेच्या ठिकाणी शाळेची इमारत पुर्णपणे तयार झालेली आहे, त्यामुळे तेथे 8 वी ते 10 वीचे वर्ग सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून ही मागणी पूर्ण करावी. कुदळवाडीतील विद्यार्थ्यांचा विचार करता येथे 8 वी ते 10  वीचे वर्ग नव्याने निर्माण करुन पुढील वर्ग सुरु करणे अत्यंत गरजेचे असल्याचे यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.