Chikhali News : चिखली-कुदळवाडीसाठी महावितरणचे स्वतंत्र शाखा कार्यालय सुरु करा : दिनेश यादव

एमपीसीन्यूज : चिखली -कुदळवाडी भागातील महावितरणची वीज यंत्रणा सुधारण्यात यावी. तसेच या परिसरातील वाढलेली ग्राहक संख्या लक्षात घेता या भागासाठी महावितरणचे स्वतंत्र शाखा कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महावितरणकडे केली आहे.

या संदर्भात यादव यांनी महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

_MPC_DIR_MPU_II

चिखली – कुदळवाडी भागातील नागरिक, उद्योजक आणि व्यापारी यांना सध्या असंख्य वीज समस्यांचा सामना करावा लागत असल्याकडे यादव यांनी नाळे यांचे लक्ष वेधले. या भागातील नागरिकांना सर्वोत्तम सेवेचा लाभ देण्यासाठी स्वतंत्र फिडर मिळावा तसेच सध्या असलेल्या विद्युत रोहीत्रांची क्षमता वाढवून मिळावी अशी मागणी यादव यांनी यावेळी केली.

तसेच चिखली आणि कुदळवाडी भागासाठी सध्या पंधरा ते वीस नवीन विद्युत रोहित्रांची गरज आहे. महावितरणने त्यांची त्वरीत उभारणी करावी.   कुदळवाडी- चिखली हा भाग मोशी महावितरण कार्यालयाशी संलग्न असून या भागात महावितरणची सुमारे 85 हजारांपेक्षा जास्त ग्राहक संख्या झाली आहे.

त्यामुळे मोशी शाखेचे विभाजन करून कुदळवाडी – चिखली असे नवीन शाखा कार्यालय सुरु करण्याची आग्रही मागणीही यादव यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.