Chikhali News : कुदळवाडी महापालिका शाळेत लसीकरण केंद्र सुरू करा : दिनेश यादव

एमपीसीन्यूज : कुदळवाडी भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी कामगार, लघुउद्योजक, व्यापारी मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे कुदळवाडीसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे, अशी मागणी फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

या संदर्भात यादव यांनी नुकतीच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी फ प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड, माजी महापौर राहुल जाधव आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

कुदळवाडी भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी कामगार, लघुउद्योजक, व्यापारी मोठ्या प्रमाणात राहतात. कुदळवाडीतील नागरिकांना लस घेण्यासाठी चिखली -जाधववाडी या ठिकाणी जावे लागते. अनेक ज्येष्ठ नागरिक येण्याजाण्याचे व्यवस्था नसल्याने व लसीकरण केंद्र लांब असल्याने लसीकरणासाठी टाळाटाळ करतात.

त्यामुळे कुदळवाडी महापालिका शाळेत लसीकरण केंद्र सुरू झाल्यास जेष्ठांसह कामगारांना याचा फायदा होईल. शिवाय लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढेल, असे यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.