Chikhali News : पंतप्रधान आत्मनिर्भर निधीसाठी सिंडिकेट बँकेकडून टाळाटाळ; दिनेश यादव यांचा आंदोलनाचा इशारा

एमपीसीन्यूज : कोरोना संकटामुळे पिचलेल्या गोरगरीब पथ विक्रेत्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेचे अर्ज मंजूर करुन कर्ज वाटप करण्यास चिखली- कुदळवाडी येथील सिंडिकेट बँकेकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी
थेट बँकेच्या शाखा कार्यालयात जाऊन कर्ज वाटप न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.

देशभरातील पथविक्रेत्यांना तात्काळ दहा हजारांचे कर्ज उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर योजना जाहीर केली आहे.

मात्र, या योजेनला आता बँकांकडून खोडा घातला जात असल्याच्या तक्रारी पथविक्रेत्यांकडून केल्या जात आहेत. तसेच पथविक्रेत्यांना कर्ज देण्यास कुदळवाडीच्या सिंडिकेट बँकेने अडवणूक सुरू केल्याच्या तक्रारी स्थानिक पथ विक्रेत्यांनी केल्या आहेत.

त्यावर स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी थेट बँक अधिकाऱ्यांना भेटून कर्ज देण्यास का टाळाटाळ केली जात आहे, असा जाब बँक अधिकाऱ्यांना विचारला. पात्र पथविक्रेत्यांची कर्जे त्वरित मंजूर करावीत; अन्यथा बँकसमोर आंदोलन करण्याचा इशारा यादव यांनी दिला आहे.

तसेच पुढील काळात अशा तक्रारी येऊ नयेत याची दक्षता बँकेने घ्यावी, असेही यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बजावले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.