Chikhali News : ‘आत्मनिर्भर’ योजनेत कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करा – दिनेश यादव

एमपीसीन्यूज : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजना गोरगरीब नागरिकांसाठी वरदान असून त्या योजनेसाठी अनेकांनी बँकांकडे अर्ज सादर केले आहेत. परंतु, कर्जवाटप करायला बँका तयार नसून अनेक ठिकाणी टाळाटाळ केली जात आहे. कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याची मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

यासंदर्भात यादव यांनी महापालिका नागरवस्ती विभागाचे सहायक आयुक्त अजय चाटणकर यांना निवेदन दिले. यावेळी पुजा आल्हाट आणि रामकृष्ण लांडगे उपस्थित होते. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजना गोरगरीब नागरिकांसाठी वरदान असून त्या योजनेसाठी अनेकांनी बँकांकडे अर्ज सादर केले आहेत. परंतु, कर्जवाटप करायला बँका तयार नसून अनेक ठिकाणी टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी पथविक्रेत्यांकडून करण्यात आल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

अनेक पथ विक्रेत्यांची कर्ज प्रकरणे बँकेकडे असून सगळी पूर्तता करूनही बँका कर्ज द्यायला आडकाठी आणत आहेत. दिनेश यादव यांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांना समक्ष भेटून कर्ज येण्याची विनंती केली. मात्र तरीही अद्याप कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आलेली नाहीत.

या पार्श्वभूमीवर स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही यादव यांनी चाटणकर यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.