Chikhali News : पांडुरंगाची कृपा ! मुसळधार पावसात सफाई कामगार महिलांना मिळाले रेनकोट

एमपीसीन्यूज : कोरोना संकट असो किंवा अन्य कोणतेही संकट, सकाळपासून प्रभागातील साफसफाईचे काम चोखपणे पार पडणाऱ्या कंत्राटी सफाई कामगार महिलांना आणि घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडी कामगारांना भाजप युवा नेते पांडुरंग तथा पांडा साने आणि नवदुर्गा सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष रुपाली साने यांच्यावतीने रेनकोट वाटप करण्यात आले. दरम्यान, मुसळधार पावसात आमच्या सारख्या कंत्राटी कामगारांना पांडाभाऊंनी रेनकोट उपलब्ध करून दिले. खरोखर त्यांच्या रूपाने साक्षात पांडुरंगाचीच आमच्यावर कृपादृष्टी झाल्याची भावना उपस्थित सफाई कामगार महिलांनी व्यक्त केली.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापालिका प्रभाग क्रमांक 1 चिखली-मोरेवस्ती येथील आरोग्य कर्मचारी, महिला घंटागाडी व सफाई कामगार यांना रेनकोट तर नवदुर्गा सखी मंचच्या सर्व सदस्य महिलांना भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे यांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कोरोना संकटात रुग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आले.

साने चौकाजवळील महापालिका शाळेत शुक्रवारी ( दि. 23) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भाजप युवा नेते पांडुरंग तथा पांडा साने, नवदुर्गा सखी मंचच्या संस्थापक-अध्यक्षा रुपाली साने, माजी महापौर राहुल जाधव, ‘फ’ प्रभाग समिती अध्यक्ष कुंद गायकवाड, स्वीकृत सदस्य संतोष मोरे, दिनेश यादव, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आनंदा यादव, नगरसेवक सागर हिंगणे, जय भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र यादव, माजी सरपंच यशवंत साने, राजू म्हेत्रे, माणिक म्हेत्रे, तुकाराम जाधव, गणेश मोरे, अविनाश मोरे, संतोष मोरे, अमोल म्हेत्रे, अनिल धन्त्रे, विजू म्हेत्रे, हरीष अमृतकर, विशाल नेवाळे, दीपक घन, कविता हिंगे, निखील मोरे, श्रीराम जाधव, संदिप गोंजारी, सामाजिक कार्यकर्त्या अलका मोरे आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते दिगंबर साने, अभिजीत साने, कुलदीप साने, आनंद साने, विक्रांत साने, अजय साने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

लोकप्रतिनिधी म्हणून सदैव साने कुटुंबाच्या पाठीशी : आमदार महेश लांडगे

महेश लांडगे म्हणाले,  कोरोना काळातही सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने यांनी प्रभागातील नागरिकांना कधीही अंतर दिले नाही. कोरोनाबाधित रुग्णांसाठी त्यांनी सुरु केलेल्या मोफत रुग्णवाहिका सेवेचाही प्रभागातील नागरिकांना फायदा होत आहे. त्यांच्या पत्नी रुपालीताई यांनी सुद्धा प्रभागात मोठी महिला चळवळ उभी केली आहे. एकूणच या साने कुटुंबाचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. अन्य प्रभागातील कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा. लोकप्रतिनिधी म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे.

पांडुरंग साने म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सेवाकार्याच्या आवाहनाला साद देत आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी व वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना पावसापासून बचावासाठी पावसाळी रेनकोटचे व 500 छत्र्यांचे वाटप केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर प्रभागात जनजागृतीचे काम सुरु आहे. नागरिकांनी भीती न बाळगता आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार घरी राहून स्वतःबरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.