Chikhali News : यंदाचा बैलपोळा साधेपणाने साजरा

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाधववाडी, कुदळवाडी, चिखली, मोशी परिसरात अत्यंत साधेपणाने यंदाचा बैलपोळा व सर्वपित्री अमावास्या साजरी करण्यात आली.

पारंपरिक पद्धतीने बैलांना सजवून बैलांच्या अंगावर गुलाल व भंडारा उधळून बैलांचे औक्षण करण्यात आले.  कोरोनाचा वाढता कहर पाहता व या सनातील वाढती गर्दी टाळण्यासाठी साधेपानाने पोळा साजरा करण्यात आला.

दरवर्षी बैल पोळ्याच्या दिवशी चिखली, जाधववाडी, मोशी, कुदळवाडी परिसरात वाजत गाजत बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. परंतु यावर्षी बैलपोळा सणावर कोरोनाचे सावट असल्याने बळीराजाने या सर्व गोष्टींना फाटा देत साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.