Chikhali News : ‘चिखली गावातील बस थांबा नागेश्वर विद्यालय येथे स्थंलातरीत करा’

एमपीसीन्युज : चिखली येथील पीएमपीएमएलचा मुख्य बस नागेश्वर विद्यालय येथे थांबा स्थलांतरित करावा, तसेच चिखली-मनपा आणि चिखली-पिंपरीगाव या दोन्ही बस मार्गांचे विस्तारीकरण करण्याची मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदभार्त प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, संतोष मोरे आणि पांडुरंग साने यांनी पिंपरी चिंचवड विभागीय व्यवस्थापक संतोष माने यांना निवेदन दिले आहे.

चिखली गावातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील मुख्य बसथांब्यावरून डांगे चौक, मनपा, पिंपरी गाव या मार्गावरील बसचे संचलन होते. मात्र, सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

पीएमपी बस व्यतिरिक्त अन्य वाहने मोठ्या संख्येने येथे उभी असतात. त्यामुळे बसला ये- जा करण्यासाठी अडथळा होतो. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत असते.

हा मुख्य थांबा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून श्री नागेश्वर विद्यालय येथे स्थलांतरित करावा. या विद्यालय परिसरात धर्मराज नगर आणि महापालिकेचा संतपीठ हा प्रकल्प आहे. तसेच या भागातील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

नागेश्वर विद्यालय येथे मुख्य बस थांबा सुरु केल्यास या भागातील नागरिकांची बस अभावी होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल, तसेच चिखली गावातील वाहतूक कोंडीची समस्याही दूर होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.