Chikhali News : चिखलातील वीजग्राहकांचे संभाजीनगर शाखेला स्थलांतर केल्यास तीव्र पडसाद उमटतील – दिनेश यादव

चिखली, कुदळवाडीतील वीजग्राहकांचे संभाजीनगर शाखेला स्थलांतर करण्यास नागरिकांचा विरोध

एमपीसीन्यूज ; महावितरणच्या चिखली, कुदळवाडीतील वीजग्राहकांचे संभाजीनगर शाखेला स्थलांतर करण्याचा डाव महावितरणने आखला आला. त्याला चिखली परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे वीजग्राहकांचे संभाजीनगर परिसरात स्थलांतर केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा गर्भित इशारा स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी दिला आहे.

या बाबत यादव यांनी गणेशखिंड येथील महावितरणच्या कार्यकारी अभियत्यांना निवेदन दिले आहे.त्यात म्हटले आहे की, महावितरणचे नवीन कार्यालय चिखलीत व्हावे अशी स्थानिक वीज ग्राहकांची मागणी आहे. ही मागणी गेल्या 67 र्षांपासून होत आहे. मात्र, त्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले गेले.

चिखलातील जुन्या वीज ग्राहकांसाठी नवीन शाखा सुरु करण्याऐवजी त्यांना संभाजीनगर येथील शाखेकडे स्थलांतरीत केले जात आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळे चिखली, कुदळवाडी परिसरातील वीज ग्राहकांना आता जवळचे कार्यालय सोडून संभाजीनगर येथील कार्यालयात जावे लागणार आहे.

नवीन शाखा, नवीन कर्मचारी देण्याची मागणी असताना स्थलांतर करून नागरिकांना आणखीनच त्रास दिला जात असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.

काही अधिकाऱ्यांच्या आर्थिक सोयीसाठी ही भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करीत चिखली, कुदळवाडीतील परिसरावर अन्याय करुन महावितरणच्या अधिकाऱ्यांना चरण्यासाठी नवे कुरण आम्ही निर्माण होऊ देणार नसल्याचे दिनेश यादव यांनी ठणकावून सांगितले आहे.

चिखली परिसरातील वीज ग्राहकांची गैरसोय होऊ देणार नाही. स्थानिक वीज ग्राहकांचे अन्य कार्यालयात स्थलांतर झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशाराही यादव यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.