Chikhali News : चिखलीमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्याबाबत शनिवारी (दि. 22) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात फिरोज गुलमोहम्मद अत्तार (वय 43, रा. रुपी हाऊसिंग सोसायटी, रुपी नगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अत्तार यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो दुचाकी (एम एच 14 / डी क्यू 7574) 16 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. 17 ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

दुस-या प्रकरणात इर्शाद अहमद अन्सारी (वय 53, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी यांनी त्यांची 80 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / जे सी 7638) शनिवारी (दि. 22) सकाळी साडेआठ वाजता कृष्णानगर,  स्पाईन रोड येथे गुंजकर हॉस्पिटल समोर रस्त्याच्या बाजूला पार्क केली. भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी अन्सारी यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुपारी अडीच वाजता उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.