_MPC_DIR_MPU_III

Chikhali News: वडमुखवाडीतील रेडझोनमधील अनधिकृत बांधकाम भुईसपाट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरु केली आहे. इ क्षेत्रिय कार्यालय मौजे वडमुखवाडीतील रेडझोन मधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. तसेच मोशीतीलही अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

मागील काही दिवसांपासून महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. सोमवारी ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय एकूण 36 अनधिकृत बांधकाम असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 42007 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आली आहेत. तीन पोकलेन , पाच जेसीबी , 25 मजूर व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , सह शहर अभियंता मकरंद निकम यांचे उपस्थितीत कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे नियत्रंणाखाली उपअभियंता हेमंत देसाई, सुर्यकांत मोहिते , सुधीर मोरे तसेच पाच कनिष्ठ अभियंता व एकूण 35 बीट ऑफीसर तसेच पोलीस विभागामार्फत पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, प्रकाश जाधव, शिवाजी गवारे , चार पीएसआय, 42 पोलीस कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात होता.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.