Chikhali News : काळूबाई मंदिराचा पाणीप्रश्न मिटला; पांडुरंग साने यांनी स्व:खर्चातून केली बोअरवेलची व्यवस्था 

एमपीसीन्यूज  : चिखली-मोरेवस्ती येथील अष्टविनायक चौकातील  काळुबाई व तुळजाभवानी मंदिरात पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी भाजप युवा नेते पांडुरंग साने यांनी स्व:खर्चातून बोअरवेलची व्यवस्था केली.  त्यामुळे या मंदिरासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले  आहे. 

या मंदिरात दैनंदिन पूजा अर्चा व साफसफाईसाठी   पाण्याची टंचाई जाणवत होती. मंदिराचे विश्वस्त चांगदेव मोरे व  तुकाराम  मोरे यांनी  पांडुरंग साने यांची भेट घेत  पाण्यासाठी  बोअरवेलची मागणी केली होती. या मागणीला पांडुरंग साने  सकारात्मक प्रतिसाद दिला. साने यांनी तात्काळ ही मागणी मान्य करीत बोअरवेल खोदण्यासाठी संबंधित  यंत्रणेला पाचारण केला.

त्यानंतर  काळूबाई मंदिराजवळ  बोअर खोदाई कामाचे पूजन पांडुरंग साने यांच्या हस्ते झाले. या बोअरवेलमुळे मंदिराला मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी व भाविकांनी  समाधान व्यक्त करीत साने यांचे आभार मानले.

यावेळी फ प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजू  मोरे, तुकाराम जाधव, महादेव आमटे, संतोष मोरे, गणेश  मोरे, संदीप गोंजारी आदी  उपस्थित होते.

याबाबत  पांडुरंग साने म्हणाले,  काळूबाई मंदिराचे विश्वस्त चांगदेव मोरे, तुकाराम मोरे, भगवान मोरे यांनी  मंदिरासाठी  पाण्याची कमतरता भासत असल्याचे सांगितले. तसेच पाण्यासाठी बोअरवेल घेण्याची मागणी केली.  त्यानुसार  धार्मिक  कार्यासाठी मी स्व :खर्चातून बोअरवेलची व्यवस्था केली. त्यामुळे मंदिराला आता मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.