Chikhali News : रस्ता दुभाजकांमधील झाडे जगविण्यासाठी त्यांना वेळेवर पाणी द्या – दिनेश यादव

एमपीसीन्यूज : चिखली, कुदळवाडी भागातील रस्ता दुभाजकामध्ये लावलेली झाडे पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्या झाडांना पाणी वेळेवर देण्याची मागणी फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महापालिकेचे उद्यान विभाग अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे केली आहे.

याबाबत यादव यांनी गायकवाड यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. चिखली, कुदळवाडी भागातील रस्ता दुभाजकामध्ये अनेक झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे जगवण्यासाठी त्यांना वेळेवर पाणी दिले पाहिजे. सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे पाण्याअभावी झाडे सुकू लागली आहेत. या झाडांना जगविण्यासाठी उद्यान विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी वेळेवर झाडांना पाणी द्यावे, अशी मागणी यादव यांनी निवेदनात केली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय तापकीर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.