Chikhali News : हळदी कुंकू समारंभात विधवा महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज – परंपरेला छेद देत हळदी कुंकू संमारंभात चिखलीत विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. नगरसेविका अश्विनी जाधव व संतोष जाधव यांनी हा अभिनव उपक्रम राबवत 51 विधवा स्त्रियांना साडी, चोळी देऊन सन्मानित केले.

_MPC_DIR_MPU_II

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नी पुजा लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणी थडी 2021 हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी 51 विधवा महिलांना हळदी कुंकु समारंभात पुजा लांडगे यांच्या हस्ते साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले.

नगरसेविका अश्विनी जाधव म्हणाल्या, शहरात प्रथमच हा उपक्रम साजरा होत आहे. पतीच्या मृत्यू नंतर विधवेचे आयुष्य काळोखमय होते, तिच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1