Chikhali News : शिवरकर चौकात महिलांच्या हस्ते शिव मूर्तीचे पूजन

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र वितरक सेना आणि शिवस्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने ताम्हाणे वस्ती येथील शिवरकर चौकात साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी महिलांच्या हस्ते शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला.  कोरोनामुळे यंदा मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

महाराष्ट्र वितरक सेनेचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष रावसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिवजयंती उत्सवाचे यंदा 13 वे वर्ष आहे. सकाळी परंपरेनुसार महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद, जिल्हा समन्वयक सर्जेराव भोसले, युवासेना प्रमुख सचिन सानप, काशिनाथ जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. सायंकाळी महिलांच्या हस्ते शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

या नंतर उपस्थित शिवप्रेमींच्या वतीने शिववंदना घेण्यात आली. भाऊसाहेब थोरात, दादा ठाकरे, आबा पांचाळ, अशोक गायकवाड, सतीश डिसले, संजय गाढवे, आनंद हिंगे, वैभव थोरात, वैभव छाजेड, बाळासाहेब नाकाडे, हरिभाऊ लोहकरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.