Chikhali News : चिखलीत कारागृह होऊ देणार नाही – दिनेश यादव

एमपीसीन्यूज : चिखली येथील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीत नवीन कारागृह करण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाचा  निषेध करीत चिखलीत नवीन कारागृह होऊ देणार नसल्याचा इशारा स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिला आहे.

आमदार महेश  लांडगे यांच्या मार्फत या प्रस्तावाला लोकतांत्रिक पद्धतीने विरोध केला जाईल. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यादव यांनी दिला आहे.

_MPC_DIR_MPU_II

चिखली भागात नवीन कारागृह उभारण्याची घोषणा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. याबाबतच्या वृत्ताचा दाखला देत यादव यांनी प्रस्तावित कारागृहाला विरोध केला. चिखली हा भाग रहिवासी वसाहत असताना कुणालाही विश्वासात न घेता परस्परपणे निर्णय कसा घेतला गेला ?, असा सवाल यादव यांनी उपस्थित केला आहे.

चिखलीत कारागृह होऊ नये, अशी जनभावना आहे आणि ती शासनापर्यंत आमदार महेश लांडगे यांच्यामार्फत पोहोचवू. तरीही शासनाने निर्णय न बदलल्यास आंदोलन करून हा निर्णय रद्द करायला भाग पाडू, असे दिनेश यादव यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. गोरगरीब जनतेला घरे घेता यावीत या उद्देशासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे कारागृहाऐवजी चिखलीत विकासाचा अन्य कोणताही चांगला प्रकल्प शासनाने आणावा, अशी मागणीही यादव यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1