Chikhali News : चिखली-मोरेवस्ती येथील सर्वधर्मसमभाव शिवमंदिराच्या नामफलकाचे अनावरण

एमपीसीन्यूज : महाशिवरात्रीनिमित्त चिखली, मोरेवस्ती येथील स्वामी विवेकानंद सोसायटीमधील शब्दब्रम्ह संस्थेच्या योगेश्वर केदारनाथ सर्वधर्मसमभाव शिवमंदिराच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे  युवा नेते पांडुरंग साने यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक प्रभाकर चव्हाण, योगशिक्षक दत्तात्रय महापुरे, सतीश सावंत, ज्ञानेश्वर कुंजीर, संस्थेच्या स्मिता जाधव, मेघना आंब्रे, स्वाती सावंत, आश्लेषा चाळके व अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.

संस्थेच्या विद्यार्थी पेटीवर भजन व भक्तिगीते सादर करीत वातावरण भारावून टाकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घेत व मोजक्या कार्यकर्त्यांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.

राष्ट्रवादीचे यश साने यांच्या हस्ते आरती

महाशिवरात्रीनिमित्त शब्दब्रम्हच्या योगेश्वर केदारनाथ सर्वधर्मसमभाव शिवमंदिरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांच्या हस्ते आरती करण्यात आली. संस्थेचे संस्थापक प्रभाकर बळवंत चव्हाण, दशरथ सपकाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.