chikhali News : चिखलीच्या भैरवनाथ मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या : दिनेश यादव

एमपीसी न्यूज : देहू – आळंदी मार्गावरील टाळगाव चिखली या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या  वैकुंठ गमन प्रसंगी त्यांचे टाळ चिखलीत पडले होते. म्हणून या गावाला टाळगाव चिखली असे म्हटले जाते.  यामुळे चिखली गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून हा दर्जा मिळवू, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत दिनेश यादव यांनी राज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाला निवेदन पाठविले आहे. त्यात चिखली गावातील भैरवनाथ मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

मंत्रालय स्तरावरून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात चिखली गावातील भैरवनाथ मंदिर मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिखलीचा नावलौकिक वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास दिनेश यादव यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

भैरवनाथ मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.