-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chikhali News : गुरुपौर्णिमेनिमित्त चिखलीत उद्या ‘गुरुगौरव सन्मान’ सोहळा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : गुरुपौर्णिमेनिमित्त जय भवानी प्रतिष्ठान आणि स्व. अलकाताई बाळासाहेब यादव प्रतिष्ठान, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, रविवारी चिखली परिसरातील शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

चिखली गावातील दत्त मंदिर सभागृहात सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते चिखली परिसरातील शिक्षकांचा सन्मान करण्यात येईल. आळंदी देवस्थान समितीचे अध्यक्ष अभय टिळक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे आदर्श, म्हणूनच गुरु पौर्णिमेनिमित्त चिखली परिसरातील गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक जितेंद्र यादव आणि शीतल यादव यांनी दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.