Chikhali News: नागरिकांना पाच लाखांचे विमा संरक्षण, नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या पुढाकाराने चिखली मधील नागरिकांना पाच लाखाच्या आरोग्य विम्याचे कवच प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – आयुष्यमान भारत’ अंतर्गत मोफत 5 लाखांचे आरोग्य विमा कार्ड वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ आज (गुरुवारी) करण्यात आला. या अंतर्गत तब्बल अकरा हजार नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे.

चिखली येथे नगरसेवक व फ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष कुंदन गायकवाड यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शहराच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेविका स्विनल म्हेत्रे, साधना मळेकर, नगरसेवक दिनेश यादव, संतोष मोरे, संदीपभाऊ शेलार क्रीडा अध्यक्ष निगडी चिखली मंडल, सौ.कविता हिंगे अध्यक्षा निगडी चिखली मंडल भाजपा व चिखली ग्रामस्थ उपस्थित होते.

या योजनेद्वारे 5 लाख रुपये प्रति वर्ष मोफत उपचार,प्रायव्हेट व सरकारी हॉस्पिटलमध्ये मिळणार आहेत. ह्या कार्डचा वापर कायमस्वरूपी राहणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता विधायक कामे हाती घ्या असे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक गायकवाड यांनी चिखलीमधील नागरिकांना केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – आयुष्यमान भारत’ अंतर्गत मोफत 5 लाखांचे आरोग्य विमा कार्डचे वाटप सुरु करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी मार्गदर्शन केले. तसेच आज चिखली येथील विकास अनाथ आश्रमाला 50 गोणी तांदूळ, गहू, तेल डब्बे, बिस्कीट पुडे असा शिधा वाटप करण्यात आला.

कोरोना संकटानंतर आरोग्य सुविधेचे महत्व किती आहे याची सर्वांनाच पुरेपूर जाणीव झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्य सुविधेसाठी होणारा खर्च हा अत्यन्त त्रासदायक विषय आहे. त्यामुळे आयुष्यमान भारत सारख्या योजनेचा लाभ चिखलीतील नागरीकांना मिळवून देत आहे .

योजनेचा लाभ घेण्यासाठी 9881010312 / 9765575889 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे नागरिकांना आवाहन आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सोशल ऍक्टिव्हिटी महिला फौंडेशन, कुंदनशेठ गायकवाड युवा मंच, संदीपभाऊ शेलार सोशल फौंडेशन यांच्या माध्यमातून राबवण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.