Chikhali News: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कोकणातील पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि कै. दत्ताकाका साने प्रतिष्ठान  यांच्या संयुक्त  विद्यमाने  कोकणातील पूरग्रस्त चिपळूण आणि खेड तालुक्यात जीवनाश्यक साहित्याची मदत करण्यात आली. जीवनावश्यक साहित्याचे पाचशे किट घरोघरी वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश  साने आणि त्यांच्या 40 सहकाऱ्यांनी नुकतीच  चिपळूण आणि खेड तालुक्यातील  पूरग्रस्त भागाला भेट दिली.  त्यावेळी  पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांची आस्थेने  विचारपूस करीत त्यांना मदत  म्हणून जीवनावश्यक साहित्याचे किट देण्यात आले.

चिपळूण तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी, चिपळूण बाजार पेठ,  शंकरवाडी, मारकेंडी मिर्जोळी, जुवाड वस्ती, कलबस्ते, भोईवाडा तसेच खेड तालुक्यातील पोसरेगाव, धामनंद, साखरगाव व पंधरा गाव विभागातील विविध कातकरी वाड्या वस्त्यांवर या मदतीचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.