Chikhali News : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुदळवाडीत सेवाकार्य

'आयुष्यमान भारत' अंतर्गत कुटुंबाना मोफत ५ लाखांचे विमा कवच; यादव यांनी प्रभागात विधायक उपक्रम हाती घेतला आहे.

एमपीसीन्यूज : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा न करता समाजातील विविध घटकांसाठी सेवाकार्यात योगदान द्यावं, असं आवाहन केलं आहे. या आवाहनाला साद देत, शहर भाजयुमो सरचिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी प्रभागात विधायक उपक्रम हाती घेतला आहे.

प्रभागातील कुदळवाडीमधील नागरिकांना केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – आयुष्यमान भारत’ अंतर्गत मोफत 5 लाखांचे आरोग्य विमा कवच काढून देण्यात येणार आहे, जेणेकरून या विम्यामुळे दवाखान्याच्या खर्चातून संपूर्ण कुटुंबाची कायमची मुक्तता होऊ शकेल. या योजनेचे उद्घाटन भाजप  शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते होणार आहे.

‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – आयुष्यमान भारत योजनेसाठी प्रभागातील पात्र नागरिकांनी गुरुवारी (दि. 22 ) सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत स्वतःचे आधारकार्ड, पंतप्रधान योजनेचे पत्र किंवा रेशन कार्ड, ज्यांना पत्र मिळाले नाही त्यांनी रेशनकार्ड व आधारकार्ड घेऊन आपले नाव यादीमध्ये तपासून घ्यावे. यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुदळवाडीतील शिवसाई पतसंस्था शेजारी, विठ्ठल – रुख्मिणी मंदिराजवळील कार्यालयात अथवा योजनेच्या अधिक माहितीसाठी काका शेळके (9881245572), दीपक घन ( 9890902805) यांच्याशी संपर्क साधावा.

याबाबत दिनेश यादव म्हणाले, यंदा करोनामुळे आपण अनेक संकटांना तोंड देत आहोत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध घटकांसाठी सेवाकार्य हाती घेत ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत कुटुंबाना मोफत ५ लाखांचे आरोग्य विमा कवच देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

आयुष्यमान भारत योजनेत 30 हजारांपासून तीन लाखांपर्यतचे उपचार घेता येतात. तर पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. आयुष्यमान भारत ही योजना कागदपत्र विरहित योजना आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यादव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.