Chikhali News : चिखली -कुदळवाडीतील नाले तुंबले; दुर्गंधीसह डासांमुळे नागरिक त्रस्त

नाल्यांची सफाई व खोलीकरण करण्याची मागणी

एमपीसीन्यूज : चिखली कुदळवाडीतील सर्व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे नाले तुंबून परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. डासोत्पत्तीमुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, ताप अशा साथींच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील सर्व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करून खोलीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या संदर्भात स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी फ क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे आणि फ प्रभाग सभापती कुंदन गायकवाड यांना लेखी निवेदन दिले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मेहता, लकी नागटिळक, महेश आवटे उपस्थित होते.

कुदळवाडी -चिखली भागातील सर्व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला पहायला मिळत आहेत. त्यामुळे नाले सफाई करून नाल्याचे खोलीकरण करुन संपूर्ण गाळ बाहेर काढणे गरजेचे आहे.

त्यामुळे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल. त्यातून परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल. सध्या पाणी जिरवण्यासाठी फक्त ओढे, नाले व नदी हीच ठिकाणी शिल्लक आहेत. त्यामुळे नालेसफाई प्रमाणे खोलीकरण देखील महत्त्वाचे असल्याकडे दिनेश यादव यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.