Chikhali: तंबाखूचा साठा केल्याप्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा; 18 हजाराची तंबाखू जप्त

एमपीसी न्यूज –  कोरोनामुळे संचारबंदी असतानाही 18 हजार रूपये किमतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखूचा साठा केल्याप्रकरणी एकाविरूद्ध चिखली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोपाळ संतोष चौधरी (वय 40, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी सोपान इंगळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी चौधरी याने तंबाखूजन्य पदार्थाचा अवैध साठा केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार, या पथकाने छापा मारला. या कारवाईत 18 हजार 165 रूपये किमतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखू जप्त करण्यात आल्या. आरोपीविरूद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा आणि संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फौजदार सोलापूरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.