Chikhali : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना स्पाईन रोड चिंचवड येथे आठ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.

जयभीम ऊर्फ भावड्या भिका भालेराव (वय 24, रा. स्पाईन रोड, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बबल्या रंधवे, जाकीर ऊर्फ डॅनी पठाण, दादा गवळी, आदर्श ऊर्फ छोट्या मगर, सुशांत झिटे, शुभम काळभोर, रोहित ऊर्फ चिकण्या रुपेश खोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावड्या आठ जून रोजी स्पाईन रोडवरील विनायक स्वीट होम समोर त्याचा मित्र आणि आईशी गप्पा मारत उभा होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी कोयत्याने भावड्यावर वार केले. तसेच दगडाने डोक्यात मारले. यामध्ये भावड्या गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल केला असून चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.