Chikhali : पैशाच्या वादातून तरुणाला डांबले

एमपीसी न्यूज- पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण करून डांबून ठेवले. या प्रकरणी शनिवारी (दि. 13) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी सद्दाम नाझर पटेल (वय 30 रा.तळवडे) यांनी फिर्याद दिली असून आकाश पाटोळे याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी व फिर्यादी यांच्यात पैशांवरून वाद होते. आरोपी यांनी शुक्रवारी रात्री फिर्यादी यांचे अपहरण केले. त्यांना मारहाण तसेच जीवे मारण्याची धकमी देत शनिवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत देहूरोड येथील एका हॉटेलच्या रूममध्ये डांबून ठेवले. फिर्यादी यांनी आपली सुटका करून चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.