Chikhali : विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयाची तोडफोड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखली येथे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज दुपारी चारच्या सुमारास अज्ञात तीन तरुण आले. त्यांनी केबिनची काच आणि टेबल वरील काच फोडली. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपींची अद्याप ओळख पटली नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखली मधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. कार्यालयात दुपारी त्यांच्या दोन मुली होत्या. चारच्या सुमारास तीन तरुण कार्यालयात आले. त्यांच्या हातात लोखंडी कोयत्यासारखी शस्त्रे होती. त्यांनी कार्यालयाच्या केबिनची काच तसेच टेबलवरील काच फोडून नुकसान केले. त्याचबरोबर आरोपींनी दत्ता साने यांच्या फोटोवर कोयत्याने क्रॉस वार केले. कार्यालयाची तोडफोड करून आरोपी घटनस्थळावरून पळून गेले. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.