Chikhali: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिखलीत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

Organizing a blood donation camp in Chikhali on the backdrop of Corona

एमपीसी न्यूज – कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी चिखलीत येत्या रविवारी ( दि. ७) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे यांच्या पुढाकाराने गोकुळम हौसिंग सोसायटी, पाटीलनगर, चिखली येथे शिबिर होणार आहे.

रक्तदान करण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी विशाल बोरा (9011202282), गणेश मोरे (9765117788), बलराम पवार (9764217365), बापू आमराळे (9922327285) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, व्हाट्सॲपद्वारे नावनोंदणीही करता येणार आहे. हा कार्यक्रम कोविड-19 च्या परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत आणि सुरक्षित अंतराची अंमलबजावणी करुन होईल, असेही आयोजकांनी म्हटले आहे.

विनायक मोरे स्पोर्टस फाउंडेशनच्या पुढाकाराने चिखली आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे केवळ रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक औषध म्हणून अर्सेनिक अल्बम-30 हे होमिओपॅथीक औषध सूचवले आहे. हे औषध मिळवण्यासाठी सोमनाथ मोरे (9881669397), दीपक मोरे (9767973727) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोरोना योद्धे जीव धोक्यात घालून प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत देशातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.

अशा वेळी अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. हीच वेळ आहे देशसेवा करण्याची आणि राष्ट्रभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनामनात तेवत ठेवण्याची, अशा भावना विनायक मोरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.