Chikhali : महापालिकेकडून चिखलीत डेंग्यूबाबत जनजागृती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाच्या वतीने डेंग्यू या कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहितीपत्रके, फलक लावून जनजागृती करण्यात आली.

चिखली, म्हेत्रेवस्तीतील दवाखान्यात शुक्रवारी (दि.19)जनजागृती करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिरारी डॉ. भोईर मॅडम, आरोग्य निरिक्षक अमित पिसे, एमपीडब्लू अमित सुतार उपस्थित होते. प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्याची मोहीम महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हाती घेतली आहे. त्यानुसार शुक्रवारी म्हेत्रेवस्ती येथील दवाखान्यात जनजागृती करण्यात आली.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहितीपत्रके, खासगी वैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांना तपासणी करून रुग्ण शोधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच डेंग्यूसाठी रक्तजल तपासणी मोफत असून खासगी प्रयोगशाळा यांनी डेंग्यू साठी रक्तजल माफक दरात तपासणी बद्दल सूचना देण्यात आल्या. नागरिकांना आजाराविषयी घेवायची काळजी बाबत जनजागृती करण्यात आली.

दरम्यान, आठवड्यातून एकदा घरात पाणी साठवण्याची भांडी स्वच्छ व कोरडी करून पाणी पुन्हा दोन पदरी फडक्‍याने गाळून भरावे. घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालचा ट्रे मधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे. घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी. परिसरात, घराजवळ पाण्याची डबकी असल्यास ती बुजवावीत. आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जागरूक रहावे. ताप आलेल्या रुग्णास डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध देऊ नये, असे आवाहनही महापालिकेने नागरिकांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like