Chikhali : टेम्पोच्या धडकेत पादचारी ठार

एमपीसी न्यूज – भरधाव आलेल्या एका टेम्पोने पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 25 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जाधववाडी येथे शिवरोड मोशी येथून जाधववाडी कडे जाणाऱ्या रोडवर झाला. याबाबत सोमवारी (दि. 16 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश अमर विश्वकर्मा (वय 40, रा. चिखली. मूळ रा. नेपाळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश अमर विश्वकर्मा (वय 36) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात टेम्पोवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ प्रकाश हे 25 जानेवारी रोजी सायंकाळी जाधववाडी येथील शिवरोड मोशीकडून जाधववाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या एका टेम्पोने त्यांना धडक दिली. त्यात प्रकाश यांच्या डोक्याला, कमरेला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक मूळ गावी नेपाळ येथे गेले असल्याने 16 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.