Chikhali : रस्त्यात थांबलेल्या व्यक्तीला दोघांनी लुटले

एमपीसी न्यूज – रस्त्यात लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीला दोन जणांनी लुटले. मोटारसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना स्पाईन रोड चिखली येथे कचराकुंडीजवळ नोव्हेंबर महिन्यात घडली. घटना घडल्यानंतर फिर्यादी व्यक्ती आजारी पडली. त्यामुळे त्यांनी बुधवारी (दि. 19) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

कमलेश बजरसिंग ठाकूर (वय 41, रा. लक्ष्मी पूर्ती हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलेश स्पाईन रोडने दुचाकीवरून जात होते. कचरा कुंडीजवळ आल्यानंतर ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी दोन जण मागून आले. त्यांनी कमलेश यांच्या मोटारसायकलची चावी, खिशातून मोबाईल फोन आणि दोन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 63 हजार 200 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेतला. तसेच कमलेश यांची मोटारसायकल देखील घेऊन गेले. यावेळी झालेल्या झटापटीत कमलेश अतिशय घाबरले. त्यात ते आजारी पडले. त्यामुळे घटनेनंतर त्यांना फिर्याद देता आली नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक बागुल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.