Chikhali: भरधाव वेगातील पीएमपीएमएल बसची फॉर्च्युनर कारला धडक; कारमधील पाचजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- वेगात आलेल्या पीएमपीएमएल बसने फॉर्च्युनर कारला धडक दिली. ही घटना गुरुवारी (दि. 12) पहाटे तीन वाजता कुदळवाडी ओव्हरब्रीज चौक चिखली येथे घडली. यामध्ये कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

अतिश सोमनाथ घोलप (वय 22, रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी घोलप यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 14 / एच व्ही 4791 बसवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालकाने गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास पीएमपीएमएल बस भरधाव वेगात चालवून चिखली येथील कुदळवाडी ओव्हरब्रीज चौकात थांबलेल्या फॉर्च्युनर कारला धडक दिली. यामध्ये कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यामध्ये फॉर्च्युनर कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.