Chikhali : चिखली पोलिसांनी सराईतास ठोकल्या बेडया; एकूण 4 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी सराईताला बेड्या (Chikhali) ठोकल्या असून त्याच्यावरील 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी ( दि.20) केली आहे.

टिकम बिवाराम चंद (वय 25 रा. चिंचवड, पुणे मुळ रा. मारवाड राज्य राजस्थान ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना चिखली पोलिसांना नेवाळेवस्ती व हरगुडेवस्ती दरम्यान एक संशयीत इसम मोटार सायकलवरुन येत असल्याचे दिसून आले. त्याला थांबवून त्याच्याकडील मोटार सायकलबाबत विचारले असता त्याच्याकडे मोटार चालविण्याचा परवाना व मोटार सायकल मालकी संदर्भात कोणतेही कागदपत्र उपलब्ध नव्हते. त्याने याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बॅगमधून चोरीचे दोन लॅपटॉपही पोलिसांना सापडले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पुर्णानगर व जाधववाडी येथे कारची काच फोडून त्यामधील लॅपटॉप व मोटार सायकलचे हॅन्डलला लावलेला लॅपटॉप चोरी केलेला असल्याचे कबूल केले.

Pune : दिएगो ‘अ’ संघाची जेतेपदासाठी गनर्स एफए विरुद्ध लढत

पोलिसांनी त्याच्याकडून 2 दुचाकी व 2,लॅपटॉप असा एकूण 90 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपीवरील चिखली, चिंचवड, पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल 4 गुन्हे उघडकीस आणले (Chikhali) आहेत.

ही कारवाई चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र बर्गे, वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, पोलीस हवालदार साकोरे, पांढरे, नागरे, पोलीस नाईक राठोड, गायकवाड, सुतार, पिंजारी, या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.