Chikhali : तक्रारअर्जाची चौकशी बंद करण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारताना PSIला रंगेहाथ पकडले

PSI were caught red-handed accepting bribes to close the investigation of the complaint form

एमपीसी न्यूज – तक्रार अर्ज मागे घेऊन चौकशी बंद करण्यासाठी एका पोलिसाने पाच लाखांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोलीस उपनिरीक्षकाला लाच स्वीकारताना  रंगेहाथ पकडले आहे.  पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या साने चौक पोलीस चौकीत ही कारवाई करण्यात आली. 

पोलीस उपनिरीक्षक फारुख याकूब सय्यद सोलापुरे (वय 56), असे या प्रकरणी अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी एका व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  दिलेली माहिती अशी, तक्रारदाराने चिखली येथील मोरेवस्तीत इमारत बांधली असून त्यामधील 6 फ्लॅटची विक्री झाली आहे. या फ्लॅट धारकांकडून उरलेले पैसे येणे बाकी आहे. त्यासाठी तक्रारदाराने दि. 29 मे रोजी चिखली पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला होता.

तो अर्ज चौकशीसाठी पोलीस उपनिरीक्षक सोलापूरे यांच्याकडे आला. सोलापुरे यांनी संबंधितांकडून पैसे काढून देण्यासाठी तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडे पैश्याची मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सोलापुरे याला तक्रारदाराकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.