Chikhali : रिक्षाला कट मारल्यावरून भांडण; दोघांना बिअरची बाटली, लोखंडी पाईपने मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षाला कट मारला आणि कट मारल्यानंतर रिक्षातील दोघांना बिअरची बाटली, लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 17) टॉवर लाईन रोड आणि अंगणवाडी रोड चिखली येथे घडली.

रमाकांत भगवान नोरे (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली), नितीन राजू केडेकर अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी रमाकांत नोरे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय जाधव, बुध्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमाकांत आणि त्यांचा मित्र नितीन हे दोघे नितीन यांच्या रिक्षातून (एमएच 14 / सीयू 0484) जात होते. त्यावेळी आरोपींनी दुचाकीने त्यांच्या रिक्षाला कट मारला. त्यानंतर आरोपीने उलट रमाकांत आणि नितीन यांना शिवीगाळ व मारहाण केली.

अक्षय याने बिअरची बाटली रमाकांत यांच्या डोक्यात मारली. तर आरोपी बुध्या याने लोखंडी पाईपने नितीन यांना मारून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.