Chikhali : किरकोळ कारणावरून कॉफी शॉपमध्ये राडा; मालकाला व कामगाराला बेदम मारहाण, कॉफी शॉपमध्ये तोडफोड

आरोपींनी दुकानातील फर्निचर, काचेचा दरवाजा, काचेचे काउंटर, लॅपटॉपची तोडफोड करून नुकसान केले. : Rada in a coffee shop for petty reasons; Owner and worker beaten to death, coffee shop vandalized

एमपीसी न्यूज – ऑर्डरच्या पैशांच्या कारणावरून चार जणांनी मिळून कॉफी शॉपमध्ये राडा घातला. कॉफी शॉपची तोडफोड करून शॉपच्या मालकाला व कामगाराला लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) पूर्णानगर येथील पबजी कॉफी शॉपमध्ये घडली.

आदित्य अनिल ईघे (वय 18, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश म्हस्के (रा. घरकुल, चिखली), गुंल्या व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी फिर्यादी यांच्या पबजी कॉफी शॉपमध्ये आले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीसोबत ऑर्डरच्या पैशांवरून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी कॉफी शॉपमध्ये दगड मारून काच फोडली.

फिर्यादी आदित्य यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यात आदित्य यांच्या खांद्याला, पायाला गंभीर दुखापत झाली.

दुकानातील कामगार अरमान वायाळ भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपी गुंल्या याने त्यालाही लोखंडी पाईपने डोक्यात, पाठीवर मारून जखमी केले.

अन्य आरोपींनी दुकानातील फर्निचर, काचेचा दरवाजा, काचेचे काउंटर, लॅपटॉपची तोडफोड करून नुकसान केले.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.