Chikhali: संतपीठाच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करा – दत्ता साने

एमपीसी न्यूज – चिखलीतील संतपीठाच्या निविदेत ठराविक ठेकेदारांनीच सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत रिंग झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रीयेची सखोल चौकशी करण्यात यावी. निविदा प्रक्रीयेतील संबंधित दोषी अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत निविदा प्रक्रीया थांबविण्यात यावी. अन्यथा न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक एक चिखली मधील संतपीठ बांधण्याच्या कामांच्या निविदा उघडण्यात आल्या आहेत. या निविदेचे अवलोकन केले असता, ठराविक ठेकेदारांनीच निविदा भरल्या असल्याचे दिसून आहे आहे. त्यामुळे या निविदेमध्ये रिंग झाल्याचा सशंय आहे. त्यामुळे निविदा भरल्याची माहिती देण्यात यावी.

भाजप पदाधिकारी व अधिका-यांच्या या अर्थपूर्ण मिलीभगतमुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, नागरिकांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी होत आहे. या प्रकरणातून भाजप पदाधिका-यांचा पारदर्शक कारभार उघड झाला आहे.या निविदेमध्येही ‘रिंग’ झाल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रीयेची सखोल चौकशी करण्यात यावी. निविदा प्रक्रीयेतील संबंधित दोषी अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी. तोपर्यंत निविदा प्रक्रीया थांबविण्यात यावी. अन्यथा न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशारा साने यांनी निवेदनातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.