Chikhali : घरफोडी करून 72 हजारांचे सोने लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 72 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे उघडकीस आला.

शिवाजी किसन पंडागळे (वय 42, रा. रुपीनगर तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी यांचे घर 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून कपाटातील 29 ग्रॅम वजनाचे एकूण 72 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.