Chikhali : हॉटेल टाकण्यासाठी विवाहितेकडे 35 लाखांची मागणी

एमपीसी न्यूज – हॉटेल टाकण्यासाठी माहेरहून 35 लाख रुपये आणण्याची मागणी करून घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केला. याबाबत विवाहितेने पती आणि सासू विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर येथे घडली.

दिनेश सुरेश काटे (वय 33), शुभदा सुरेश काटे (रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घरगुती कारणावरून ‘तू दिसायला ठीक नाहीस, तुझ्या आई वडिलांनी मनाप्रमाणे आमचा मानपान केला नाही. हॉटेल टाकण्यासाठी 35 लाख रुपये घेऊन ये. नाहीतर नांदवणार नाही.’ असे म्हणत विवाहितेचा छळ केला. वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण करत उपाशी ठेवले. याबाबत विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.