Chikhali : भाई झालास का म्हणत तरुणाला डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण

Saying why you became a bhai, you beat the young man by throwing chilli powder in his eye

एमपीसी न्यूज – भाई झालास का, असे म्हणत तरुणाच्या डोळयात मिरचीपूड टाकून चौघांनी मारहाण केली. ही घटना चिखली येथील कृष्णानगर भाजी मंडईजवळ बुधवारी (17) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

मोहन कु-हाडे, समाधान गवळी, समाधान गवळी याची पत्नी (तिघेही रा. भीमशक्‍तीनगर, चिखली) आणि आशिष गवळी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

दिनेश मनोहर खरात (वय 23, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि. 17) याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी खरात हे चिखली येथील कृष्णानगर भाजी मंडई येथून चालले होते.

त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी ‘काय रे तू भाई झालास का’, असे म्हणत आरोपी समाधान याच्या पत्नीने डोळ्यात मिरचीपूड टाकली. तसेच इतर तीन आरोपींनी लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.