Chikhali : इलेक्ट्रिक डीपीमधून स्पार्क झाल्याने भंगारचे गोदाम सापडले आगीच्या भक्ष्यस्थानी; कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिक डीपीमधून स्पार्क उडून ते भंगाराच्या गोदामात पडले. यामुळे भंगारचे संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोई फाट्याजवळ कुदळवाडी चिखली येथे एका भंगारच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती दिनेश यादव यांनी अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, चिखली आणि तळवडे विभागाचे तीन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले.

  • सत्तार अहमद मास्टर यांचे मोई फाट्याजवळ भंगारचे गोदाम आहे. त्यांच्या गोदामाजवळ महावितरणचा इलेक्ट्रिक डीपी आहे. त्या डीपीमधून पहाटे स्पार्क होऊन आगीच्या ठिणग्या भंगारच्या गोदामात पडल्या. यामुळे आग लागून संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. गोडाऊनमधील ग्राइंडिंग मशीन, ॲल्युमिनियम, कास्टिंग मटेरियल आणि भंगार माल जळाला. महावितरणची वायरही जळाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

उप अग्निशमन अधिकारी अशोक कानडे, रामदास गाजरे, नितीन कोकरे, सुशीलकुमार राणे, अशोक पिंपरे यांच्यासह पंधरा जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.