Chikhali : कंटेनरच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

हा अपघात शुक्रवारी (दि. 14) दुपारी साडेतीन वाजता स्पाईन रोडवर जगवॉर शोरूम जवळ झाला. : Security guard killed in container collision

एमपीसी न्यूज – कंटेनरच्या धडकेत टाटा मोटर्स कंपनीत काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 14) दुपारी साडेतीन वाजता स्पाईन रोडवर जगवॉर शोरूम जवळ झाला.

निलेश भाऊराव चव्हाण (वय 33, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास निलेश चव्हाण सायकलवरून जात होते. त्यावेळी एक कंटेनर (एनएल 01 / एडी 1754) स्पाईन रोडने जात होता. या कंटेनरने  चव्हाण यांच्या सायकलला  सायकलला धडक दिली.

या अपघातात निलेश गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. निलेश टाटा मोटर्स या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.