Chikhali : कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चारचाकी गाडीने धडक दिली. यामध्ये शुक्रवारी (दि. 8) उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

तानाजी आप्पासाहेब मेमाणे (वय 23, रा. मोरेवस्ती चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार टाटा नेकसॉन (युपी 53 / सीयु 0700) या कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काका शिवचरण जकापुरे (वय 60) हे चिखलीतील साने चौक येथून पायी जात असताना कारचालकाने त्यांना पाठी मागून जोरदार धडक दिली. यामध्य ते गंभीर जखमी झाले. ही घटना 20 फेब्रुवारी रोजी घडली. त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी (दि. 8) त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.