Chikhali : पतीच्या मित्राकडून विवाहितेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर पतीच्या मित्रानेच वारंवार लैंगिक अत्याचार केला. ही घटना चिखली येथे घडली.

वनराज सम्रुताजी देवाशी (सध्या रा. बजाज गेटसमोर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 9) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1999 ते 2014 या कालावधीत फिर्यादी महिलेच्या घरी व राजस्थानला जाणाऱ्या रस्त्यावरील लॉजमध्ये घडली. आरोपी देवाशी याची फिर्यादी महिलेच्या पतीशी ओळख होती. यामुळे तो फिर्यादी महिलेच्या घरी यायचा. फिर्यादी यांचे पती व मुलांना मारण्याची धमकी देऊन त्याने वारंवार लैंगिक अत्याचार केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.