Chikhali : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळींनी शिवीगाळ, मारहाण आणि अनैसर्गिक कृत्य करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधावत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोरेवस्ती चिखली येथे घडली.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि फिर्यादी महिलेचा 2011 साली विवाह झाला. विवाहानंतर पती आणि त्याच्या घरच्या मंडळींनी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला वारंवार शिवीगाळ व मारहाण केली. तसेच पटीने जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. सासरच्या लोकांनी विवाहितेला घरगुती कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेचे फोटो आणि कपडे जाळून शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.