Chikhali : भरधाव डंपरची सायकलला धडक; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव डंपरने एका सायकलला (Chikhali) धडक दिली. त्यात सायकलवरून जाणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आज  (दि. 30) सकाळी दहा वाजताच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली.

धीरज प्रदीप निकम (वय 16, रा. पंचनगर कॉलनी, जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी डंपर चालक ज्ञानदेव गोपाळ पवार (वय 55) याला ताब्यात घेतले आहे.

Wakad : कारखाली येऊन श्वानाचा मृत्यू , परस्परविरोधी गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज निकम हा दहावीत शिक्षण घेतो. तो मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सायकलवरून जात होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या डंपरने (एमएच 14/एचएम 6667) धीरजच्या सायकलला धडक दिली. या धडकेत धीरज गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. चिखली पोलीस तपास करीत (Chikhali) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.