BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : खून केल्याच्या रागातून आरोपीच्या घरावर दगडफेक

एमपीसी न्यूज – मित्राने मित्राचा किरकोळ भांडणातून खून केला. या रागातून खून झालेल्या मित्राच्या नातेवाईकांची आरोपीच्या घरावर दगडफेक केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी साडेनऊच्या सुमारास शरदनगर चिखली येथे उघडकीस आली.

विठ्ठल लक्ष्मण मोरे (वय 70 रा. शरदनगर चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल यांचा नातू प्रतीक उर्फ मोन्या मोरे याने सनी घाटोळकर याचा खून केला. यावरून सनी याच्या नातेवाईकांनी विठ्ठल यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच विठ्ठल यांच्या घरातील फ्रीज आणि अन्य सामानाची तोडफोड केली. हा प्रकार गुरुवारी (दि.16) पहाटे साडे बारा ते शुक्रवारी (दि. 17) सकाळी साडेनऊ या कालावधीत घडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3