Chikhali : झाडांच्या फांद्यामुळे पथदिवे जाताहेत झाकून; दिव्यांची उंची कमी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – झाडांच्या फांद्यामुळे पाथादिव्यांचा आंधार पडतो, म्हणून (Chikhali)पेठ क्रमांक 18 महात्मा फुलेनगर येथील झाडांची छाटणी केली. परंतु, अनेक ठिकाणी हे पथदिवे वारेमाप उंचीवर आहेत. इतक्या उंचीची गरजच नाही. त्यामुळे पथदिव्यांची उंची कमी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी केली आहे.

जास्त उंच पथदिव्यांमुळे झाडाच्या फांद्यामुळे रस्त्यावर अंधार पडतो. तसेच(Chikhali) पथदिव्याचा दिवा गेला तर तो क्रेन घेऊन बदलावा लागतो. क्रेनचे भाडे आणि इंधन विचारत घेता, ते अति खर्चिक आहे आणि तेही फक्त एक दिवा बदलण्यासाठी.

Pune: शहरातील अनधिकृत होर्डिंग तातडीने काढा – आबा बागुल

पथदिव्यांची उंची कमी करावी आणि शक्य असेल तर दोन झाडांच्या मध्ये पथदिवे असावे, असे पालिकेला वेळोवेळी सुचवले पण पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे  चौगुले यांनी म्हटले आहे. पथदिव्यांची उंची कमी केल्यास कमी क्षमतेच्या दिव्यांनी देखील प्रकाश मिळू शकतो आणि विजेचा वापरही कमी होऊ शकते.

पक्ष्यांसाठीही गरजेचे

शहरातील अनेक पथदिवे उंच झाडांमध्ये अडकले आहेत. तर काही पथदिवे झाडांपेक्षाही उंच आहेत. यामुळे या झाडांवर अधिवास करणाऱ्या पक्ष्यांसाठी रात्र होतच नाही.

24 तास उजेड आणि दिव्यांमुळे निर्माण होणारी उष्णता असल्याने अनेक पक्ष्यांनी आपला अधिवास सोडला आहे. शहरातील वृक्षांवर पक्ष्यांचा अधिवास कायम ठेवण्यासाठी त्यांना नैसर्गिक दिवस-रात्रीचे चक्र मिळणे गरजेचे आहे. त्या वृक्षांवर रात्रीच्या वेळी अधिक प्रकाश पडू नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे, असे पक्षीप्रेमींचे मत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.