Chikhali : पूर्णानगर येथील खाणीत आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज – पूर्णानगर येथील खाणीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज, सोमवारी (दि. 20) सायंकाळी उघडकीस आली आहे.

महादेवी सांब कोरे (वय 72, रा. जय महाराष्ट्र सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पूर्णानगर येथील खाणीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन चिखली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. खाणीमधील पाण्याच्या बाहेर मयत महिलेच्या चपला आहेत.

दरम्यान, मयत महिलेच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता मयत महिलेच्या मुलाने सांगितले की, महादेवी या मानसिक रुग्ण होत्या. पिंपरी येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर मागील तीन वर्षांपासून उपचार सुरू होते. ‘मी पाण्यात उडी मारणार’ असे त्यांनी मुलाला सांगितल्याचे देखील त्यांच्या मुलाने पोलिसांना सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.