Chikhali : मटणाचे कालवण सांडल्याने वडील रागावले; 10 वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या

The father was angry at the spillage of mutton; A 10-year-old boy committed suicide

एमपीसी न्यूज – मटणाचे कालवण सांडल्याने वडील मुलाला रागावले. या रागातून मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (मंगळवारी, दि. 21) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे उघडकीस आली.

वेंकटेश लक्ष्मण पुरी (वय 10, रा. श्रीकुंज हाऊसिंग सोसायटी, मोरेवस्ती- चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकटेश हा महात्मा फुले इंग्लिश स्कूल आकुर्डी या शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत होता.

त्याचे वडील लक्ष्मण पुरी हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत. तर आई  धुण्या- भांड्याची कामे करते. वेंकटेश याला तीन वर्षांनी लहान बहीण आहे.

_MPC_DIR_MPU_II

सोमवारी पुरी यांच्या घरी मटणाचे कालवण  केले होते. वेंकटेश याच्याकडून मटणाचे कालवण सांडले. त्यामुळे त्याचे वडील त्याला रागावले. त्याचा राग वेंकटेश याच्या मनात होता.

आज (मंगळवारी) सकाळी वेंकटेशचे वडील लक्ष्मण आणि आई आपापल्या कामासाठी निघून गेले. त्यानंतर घरी वेंकटेश आणि त्याची तीन वर्षाची लहान बहीण हे दोघेच होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लक्ष्मण घरी आल्या असता वेंकटेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

वेंकटेशच्या लहान बहिणीकडे चौकशी केली असता तिने सांगितले की, वेंकटेश याने बाथरूमच्या भिंतीवर चढून छताला ओढणीने स्वतःला लटकवून घेतले.

चिखली पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.